"ए आई काय गं आज पण खिचडी भात. रोज रोज काय खिचडी भात खायला लावते गं."
"पापड तळले आहेत ना"
"म्हणून काय झालं, सारखं सारखं खिचडी भात खाऊन कंटाळा आलाय. एकतर शेजवान चटणी पण नाये."
"मग आता जा आण दुकानातून"
"मी नाय जाणार आता.. राहुदे.. एकतर भुक लागलीय एवढी आणि खिचडी भात खायला लागतोय. एकतर दुपारी पण काय ती भाजी होती. मला आवडत नाही तेच बनवते तु नेहमी."
"बरं मग जा आण ना काहीतरी खायला."
"नको काय, राहुदे. बघेन माझं मी."
कुठेतरी वाचलं होतं, जेव्हा आपण एखाद्या साॅफ्ट वे ची अपेक्षा न करता स्वत: स्वत:चे मार्ग शोधतो तेव्हा आपण खरे Mature होतो. मग ही Maturity नुसती Sarcasm वर वापरण्यापेक्षा इंटरनेटवर कंट्रोल आणायला आणि चिडचिड कमी करायला सुद्धा वापरायला हवीच की.
त्यामुळे आता आईने कारल्याची भाजी जरी बनवली तरी मुकाट्याने खायची. आणि नाहीच जमलं तर त्यासोबत टोमॅटो साॅस घ्या, काहीतरी क्रीएटीव्ह केल्याचा तुम्हालाही आनंद आणि भाजी सगळी संपवली म्हणूल आईही खुश. ( आणि आज मी कारल्याची भाजी खाणार आहे. :-P )
"पापड तळले आहेत ना"
"म्हणून काय झालं, सारखं सारखं खिचडी भात खाऊन कंटाळा आलाय. एकतर शेजवान चटणी पण नाये."
"मग आता जा आण दुकानातून"
"मी नाय जाणार आता.. राहुदे.. एकतर भुक लागलीय एवढी आणि खिचडी भात खायला लागतोय. एकतर दुपारी पण काय ती भाजी होती. मला आवडत नाही तेच बनवते तु नेहमी."
"बरं मग जा आण ना काहीतरी खायला."
"नको काय, राहुदे. बघेन माझं मी."
प्रत्येक घरात हे conversation तसं नेहमीचंच आहे. आणि सगळ्यांची फेवरेट वांग्याची भाजी असली की बातच काही और... आजकाल मनासारखं काही झालं नाही की डोकं फुटतं. TV चालत नाही, फोडला रिमोट.. इंटरनेट स्लो चालतंय, फोडला मोबाईल.. इंटरनेटमुळे आपलं जग फास्ट आणि इझी झालं असलं तरी आपल्याला हे कळतच नाही की ह्याच इंटरनेटमुळे आपली चिडचिड होतेय. कारण झालंय असं की ज्या स्पीडने आपलं इंटरनेट चालतं तो स्पीड माणसाला आला नाहीये. इंटरनेटमुळे हवं ते आणि हवं तसं सगऴं एका क्लिकवर मिळतं आणि नेमकं तसंच बाहेरच्या जगाकडूनही आपण expect करायला लागलोय.
आजच्या 4G च्या युगात इंटरनेट सोडून देणं शक्य नाही, पण निदान त्यावर कंट्रोल तरी असायला हवा ना. आजुबाजुला काय चाललंय हे थोडफार इंटरनेटशिवाय माहीत करुन घेण्याचा प्रयत्न करायला हवाच ना. बरं ते नाही तर निदान घरात काय चाललंय हे तर पाहु शकतो. घरातल्यांशी इंटरनेट चॅट सोडून थोडी प्रॅक्टीकल चिट चॅट सुद्धा करायला हवी.कुठेतरी वाचलं होतं, जेव्हा आपण एखाद्या साॅफ्ट वे ची अपेक्षा न करता स्वत: स्वत:चे मार्ग शोधतो तेव्हा आपण खरे Mature होतो. मग ही Maturity नुसती Sarcasm वर वापरण्यापेक्षा इंटरनेटवर कंट्रोल आणायला आणि चिडचिड कमी करायला सुद्धा वापरायला हवीच की.
त्यामुळे आता आईने कारल्याची भाजी जरी बनवली तरी मुकाट्याने खायची. आणि नाहीच जमलं तर त्यासोबत टोमॅटो साॅस घ्या, काहीतरी क्रीएटीव्ह केल्याचा तुम्हालाही आनंद आणि भाजी सगळी संपवली म्हणूल आईही खुश. ( आणि आज मी कारल्याची भाजी खाणार आहे. :-P )
Well said...
ReplyDelete